CBSE इयत्ता 10 वी 12 वीचे निकाल 20 मे नंतर लागण्याची शक्यता.

CBSE निकाल 2024 तारीख: यंदा CBSE विभागाचा  इयत्ता 10 वी 12 बारावीचा निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ येत्या 20 मे नंतर जाहीर करण्याची शक्यता आहे. याविषयची अधिकृत माहीती विभागाच्या www.cbseresults.nic.in या अधिकृत संकेत स्थळावर उपल्ब्ध करण्यात आलेली आहे. विभागाकडुन सांगण्यात आले आहे की, इयत्ता 10वी व 12वी चा निकाल हा 20 मे नंतर जाहीर करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी CBSE विभागाअंतर्गत इयत्ता 10वी व 12वीची परिक्षा दिलेली आहे. ते विद्यार्थी  दिलेल्या संकेतस्थळावर आपला निकाल बघु शकतात

तसेच CBSE इयत्ता 10 वी 12 बारावीचे निकाल इतर अधिकृत वेबसाइटवर देखील तपासले जाऊ शकतात ज्यात cbseic.in,cbseresult.nic.in आणि results.cbse.nic.in यांचा सामावेश आहे. तसेच निकाल तपासण्यासाठी इतर वेबसाईट्स ही उपलब्ध आहेत. ज्यात digilockergov.in आणि results.gov.in या संकेतस्थळांचा सामावेश आहे. CBSE बोर्ड परिक्षेचा निकाल पाहण्यासाठी रोल नंबर, शाळा क्रमांक, आणि प्रवेशपत्र आयडी आवश्यक आहे.

या वर्षी  संपुर्ण देशात इयत्ता 10 वी 12 बारावी CBSE बोर्ड परिक्षेकरीता सुमारे 39 लाख उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *