Digi Marathi

साखरेऐवजी या पदार्थांचे सेवन करा! आरोग्य राहिल निरोगी

▪️ गूळ : आहारात साखरेऐवजी गुळाचा वापर करा. यामध्ये अनेक अँटिऑक्सि़डेंट असतात. जे तुमच्या आरोग्यासोबतच चवीलाही चांगले लागते. आहारात याचा वापर करुन आरोग्याची काळजी घेऊ शकता.

गुळ खाण्याचे हे आहेत फायदे :

👉 हिमोग्लोबिन वाढवते- ऍनिमिया दूर करण्यासाठी गुळ खाणे फायदेशीर असते. 100 ग्रॅम गुळामध्ये 11 mg लोहाचे प्रमाण असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास गूळ फार उपयुक्त असते.

👉 रक्तदाब नियंत्रित ठेवतो- गूळ खाण्यामुळे ब्लडप्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

👉पचनशक्ती सुधारते- गुळामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच गूळ खाण्यामुळे नियमित पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

👉 स्त्रियांसाठी उपयुक्त- सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी गुळ खाणे उपयुक्त असते. कारण मासिक पाळी, अयोग्य आहार यांमुळे स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी आढळते. यासाठी वयात येणाऱ्या मुली, मासिक पाळी असणाऱ्या स्त्रियांनी गुळाचा आहारात जरूर समावेश करावा. गरोदरपणातही लोहाचे खूप महत्त्व असते. यासाठी गरोदर स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरीनंतरही गूळ हितकारी असतो.

▪️ खजूर : साखरेच्या तुलनेत खजुरमध्ये अनेक पोषक घटक असतात. जे साखरेचे सेवन करुन मिळवू शकत नाही. खजूर अनेक प्रकारे पौष्टिक असतात. यामध्ये नैसर्गिक साखर असते. यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

खजूर खाण्याचे फायदे:-

👉हृदय विकार -हृदयाच्या आरोग्यासाठीही खजूर खाणे खूप फायदेशीर आहे. खजुरातील पोषक गुणधर्मांमध्ये हृदय मजबूत आणि निरोगी बनवण्याचे सामर्थ्य आहे. खजूर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारते.

👉कोलेस्टेरॉल-कोलेस्टेरॉलची वाढती पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी खजूर एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दररोज खजुराचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन निरोगी कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते.

👉वजन नियंत्रणात राहते-खजुरात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते त्यामुळे याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

👉मानसिक आरोग्य चांगले राहते-खजुरामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले राहते. खजुराचा मनावर ही चांगला परिणाम होतो. मेंदूचा विकास आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहते.

👉थकवा दूर होतो-खजूर खाल्ल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. खजूर हे पौष्टिक आणि उर्जेने भरलेले ड्रायफ्रूट आहे, जे नियमितपणे खाल्ल्यास शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते.

👉हाडे मजबूत बनतात-खजुरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात, जी हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असतात. आपल्या आहारात खजूर समाविष्ट केल्याने मजबूत आणि निरोगी हाडांसाठी आवश्यक ती पोषक तत्वे शरीराला मिळतात.

👉सर्दी-खोकल्यापासून रक्षण -अनेकदा सर्दी-खोकलामुळे लोक हैराण होऊन जातात. ही लक्षणे दूर करण्यासाठी खजूर खूप प्रभावी आहेत. यामध्ये असलेल्या सर्व पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी-खोकला टाळता येतो.

👉बद्धकोष्ठतेच्या समस्येवर फायदेशीर-बद्धकोष्ठतेच्या समस्येने लोक मोठ्या प्रमाणात हैराण होतात. अशा परिस्थितीत तुम्ही प्रथिने आणि फायबरने समृद्ध खजूर खावे. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी काही खजूर पाण्यात भिजवून सकाळी खा, यामुळे तुमची चयापचय क्रिया व्यवस्थित होईल.

Exit mobile version