Digi Marathi

IPL 2024 CSK vs SRH Live Streaming : बलाढ्य हैद्राबादचे यलो आर्मीसमोर तगडे आव्हाण.

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Streaming : चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही संघांची आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे.

आयपीलच्या यदांच्या मोसमातील चेन्नई सुपर किंग्स विरुध्द सनरायजर्सचे डबल हेडरचे  आयोजन करण्यात आलेले आहे. या मोसमातील या दोन्ही संघांची ही दुसऱ्यांदा समोरासमोर येण्याची वेळ आहे. यात पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदाराबाद ज्यांना ऑरेंज आर्मी म्हणुनही ओळखले जाते, यांनी बाजी मारली होती. आज होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारतो याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.

आयपीएलच्या 17 व्या मोसमात हैदराबादचा संघ अतिषय तुल्यबळ संघ म्हणुन समोर आला असुन. आतापर्यंतच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर त्यांनी चागल्या प्रकारे दबाव तयार केला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या सामन्यात चेन्नई पहील्या सामण्यात झालेला पराभवाचा वचपा कशा प्रकारे काढते की,परत हैद्राबाद संघच बाजी मारतो हे बघायला क्रिकेटप्रमी उत्सुक आहेत. ऋतुराज गायकवाड चेन्नईचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादची धुरा आहे.

चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही संघांसाठी हा सामना प्लेऑफच्या हिशोबाने महत्त्वाचा आहे. हैदराबादने 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईने 8 मधून 4 सामने जिंकलेत. हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि चेन्नई सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. तसेच हैदराबादची बॅटिंग ही अनेक दिवसांपासून सर्वच संघांसाठी डोकेदुखी ठरतेय. त्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजांसमोर हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना केव्हा?

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना रविवारी 28 एप्रिल रोजी होणार आहे.

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना कुठे?

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

चेन्नई सुपर किंग्ज टीम : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, शार्दूल ठाकुर, समीर रिझवी, रवींद्र राव , रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, रिचर्ड ग्लेसन, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, राजवर्धन हंगरगेकर, महेश तीक्षना, निशांत सिंधू आणि अरावेली अवनीश

सनरायझर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन, ट्रॅव्हिस हेड, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन आणि आकाश महाराज सिंग.

Exit mobile version