Digi Marathi

Pune Accident Accused:गर्भश्रीमंत आरोपीने दारुवरती तासाभरात 48 हजार उडवले,आणि मग दोघांना चिरडले.

Pune Accident:पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि त्याच्या मित्राने कोसी या पबमध्ये शनिवारी रात्री 48 हजार रुपयाची दारु पिल्याचे उघडकिस आले आहे.

पुण्यात एका अलिशान कारने दोन अभियंत्यांना चिरडल्याप्रकरणी पोलिसांनी तपास तीव्र केला आहे.अल्पवयीन आरोपींना दारु देणारे पबही सील करण्यात आलेले आहेत. तसेच पबचा मालक आणि मॅनेजरलाही मंगळवारी अळक करण्यात आली आहे. अपघातापुर्वी अवघ्या 90 मिनिटांत अल्पवयीन मुलाचे दोन पबमध्ये 48 हजार रुपये खर्च केल्याचे बोलले जात आहे.सकाळी कल्यानीनगरजवळ हा अपघात झाला होता.

पोलीसांनी तपास केला असताकाही सीसीटीव्ळी फुटेजमध्ये अल्पवयीन आरोपी दारु पितांना दिसत आहे.टाइम्स ऑफ इंडीयाच्या वृत्तानुसार,पुण्याचे पोलीस अधिक्षक अमितेश कुमार यांनी सांगितले की,आरोपीला यापुर्वी पब कोसीमध्ये जवळपास 48 हजार रुपयाचे बील आहेले होते. रात्री 10.40 च्या सुमारास आरोपी अणि त्याचे मित्र येथे पाहेचले,विशष बाब म्हणजे जेव्हा कोसी पबमध्ये त्यांना दारु देण्याचे बंद केल्यानंतरते रात्री 12.10 च्या सुमारास ब्लॅक मॅरियट येथे पोहोचले. वृत्तानुसार कुमार यांनी सांगितले की आम्हाला पबकडुन 48 हजाराचे बील प्राप्त झालेले असुन, सदरचे बील हे आरोपीन आपल्या कार्डद्वारे ऑनलाईन भरले असुन यात त्यांनी पिलेल्या दारुचाही सामावेश आहे.

रिपोर्टनुसार, एसीपी मनोज पाटील म्हणतात, ‘किशोरने कार चालवण्यापूर्वी दारू प्यायली आणि काही पबमध्ये गेला. आमच्याकडे मुलगा आणि त्याचे मित्र दारू पिताना सीसीटीव्ही फुटेज आहेत. रक्ताच्या नमुन्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. आतापर्यंत गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुणे पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत म्हणजे दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हाही नोंदवला आहे.

Exit mobile version