Digi Marathi

आरबीआय अहवाल: शेतकऱ्यांचा कमी फायदा

शेतीमालासाठी ग्राहक जो काही पैसा देतो किंवा जे काही किंमत देतो त्यापैकी खूप कमी पैसा हा आपल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये येत असतो. अस आम्ही नाही सांगत आहोत तर अस आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालातून स्पष्ट झालय.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कधी एक विचार केलाय का?, की आपण जो शेतीमाल पिकवतो आणि ग्राहक बाजारात तो माल खरेदी करताना जे पैसे देतो किंवा जी किंमत देतो, त्यापैकी आपल्या हातात किती पैसा येतो तर आपण याचा कधी जास्त विचार करत नाही. पण ग्राहकांना बाजारात कांदा खरेदी करताना जो पैसा दिला किंवा जी किंमत दिली त्यापैकी केवळ 36% पैसा आपल्या शेतकऱ्यांना मिळतो. आणि उरलेला पैसा म्हणजे 64% पैसा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना जातो. इतर शेतीमालाच काही वेगळ नाहीये. आपण जर द्राक्षाचा विचार केला तर ग्राहकांना दिलेल्या किमतीपैकी केवळ 35% पैसा हा आपल्या शेतकऱ्यांना मिळतो.

टोमॅटोचा जर विचार केला तर टोमॅटोच्या ग्राहकांना दिलेल्या किमतीपैकी केवळ 33% पैसा आपल्या शेतकऱ्यांना मिळतो. आणि केळी उत्पादकांच्या हातात तर फक्त 30% पैसा येतो. आणि उरलेला सगळा पैसा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना जातो.

थोडक्यात काय तर शेतीमालासाठी ग्राहक जो काही पैसा देतो किंवा जे काही किंमत देतो त्यापैकी खूप कमी पैसा हा आपल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये येत असतो. अस आम्ही नाही सांगत आहोत तर अस आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालातून स्पष्ट झालय.

रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय नुकतंच एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केलाय. यात ग्राहक एखाद्या शेतीमालासाठी मोजत असलेल्या किमतीचा किती भाग शेतकऱ्यांना मिळतो, किती भाग व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळतो याचा खुलासा केलाय.

आरबीआयच्या अहवालात स्पष्ट झालंय की ग्राहक बाजारात ज्या किमतीने कांदा खरेदी करतो त्यापैकी केवळ 36% पैसा आपल्या शेतकऱ्यांना मिळतो. तर उरलेले पैसे व्यापारी घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांना मिळतात. त्यातल्या त्यात किरकोळ विक्रेत्यांना तब्बल 31.3% पैसा मिळत असतो.

आता ग्राहकाने दिलेल्या एकूण किमतीमध्ये किती पैसा कुणाला मिळतो हे जर आपण पाहायचं झालं तर आपल्या शेतकऱ्याला 36.2% पैसा मिळतो त्यानंतर व्यापाराला 17.6% घाऊक विक्रेत्याला 15% आणि किरकोळ विक्रेत्यांना 31.3% पैसे मिळत असतात. म्हणजेच ग्राहकांना कांदा खरेदीसाठी जे काही पैसे दिले त्यापैकी सर्वात कमी पैसा हा आपल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये पडतो. आणि जास्तीत जास्त पैसा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना जातो. तसंच टोमॅटोच्या बाबतीमध्ये देखील आहे. आरबीआय ने आपल्या अहवालामध्ये टोमॅटोचा जास्तीत जास्त पैसा नेमका कुणाच्या हातामध्ये जातो याच देखील विश्लेषण दिलय.

आरबीआय ने म्हटलंय की ग्राहकांना दिलेल्या एकूण किमतीपैकी जास्तीत जास्त पैसा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना जात असतो. तर शेतकऱ्याला केवळ 33.5% पैसा मिळतो म्हणजेच निम्म्यापेक्षा देखील कमी पैसा हा आपल्या शेतकऱ्याला मिळत असतो.

आरबीआयच्या मते टोमॅटो साठी ग्राहकांना बाजारात जी किंमत दिली आहे. त्या किमतीपैकी नेमक कुणाला किती पैसा मिळतो ते देखील पाहूयात. तर आरबीआय ने म्हटल की शेतकऱ्याला ग्राहकाने दिलेल्या एकूण किमतीपैकी केवळ 33.5% पैसे मिळतात तर व्यापाऱ्याला 21.3% घाऊक विक्रेत्याला 16.1% तर किरकोळ विक्रेत्याला 29.1% पैसे मिळत असतात. म्हणजेच शेतकऱ्यांना जास्त दिवस मेहनत करायची पीक लावायचं काढणीपर्यंत सगळा खर्च करायचा त्यानंतर तो बाजारात आणायचा म्हणजे जास्त दिवसाचे जास्त मेहनत जास्त खर्च शेतकऱ्यांचा आणि जास्तीत जास्त परतावा मात्र व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळत असतो. हेच आरबीआयच्या अहवालातून स्पष्ट होतय. केवळ कांदा आणि टोमॅटोच असं नाहीये म्हणजेच ग्राहकांना दिलेल्या किमतीत शेतकऱ्याला केवळ कांदा आणि टोमॅटो मध्येच कमी पैसा मिळत नाही. तर सर्वच भाजीपाल्यांमध्ये किंवा फळांमध्ये अस होत असत.

आरबीआय ने केळीची देखील माहिती दिली आहे. आरबीआय ने सांगितलं की केळी खरेदीसाठी ग्राहक बाजारामध्ये जी किंमत देतो, त्यापैकी केवळ 30% पैसा हा आपल्या शेतकऱ्याला मिळत असतो. उरलेला तब्बल 70 टक्क्यांपर्यंतचा पैसा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना जात असतो.

आता बाजारात केळी खरेदी करताना जर एखाद्या ग्राहकांना जी किंमत दिली किंवा जो पैसा दिला त्यापैकी कुणाला किती पैसा मिळतो ते पाहूयात. आरबीआय ने सांगितलं की ग्राहकांना दिलेल्या एकूण किमतीपैकी आपल्या शेतकऱ्याला म्हणजे केळी उत्पादकाला 30.8% पैसा मिळतो व्यापाराला 26.9% घाऊक विक्रेत्याला 19.2% आणि किरकोळ विक्रेत्याला 23.1% पैसा मिळत असतो केळीच्या बाबतीमध्ये व्यापाराला सर्वाधिक जास्त पैसा मिळतो म्हणजे शेतकऱ्या नंतर सर्वाधिक पैसा व्यापाराला मिळतो 26.9% आता केळीचे पीक घेणं त्यानंतर त्यावरचा खर्च सगळा शेतकरी करत असतो परंतु परतावा मात्र व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळतो.

द्राक्षाचं उदाहरण देखील काही वेगळं नाहीये. आरबीआय ने सांगितलं की, द्राक्ष खरेदीसाठी ग्राहक बाजारामध्ये म्हणजे किरकोळ बाजारामध्ये जे काही किंमत देतो, त्यापैकी केवळ 35% पैसा आपल्या शेतकऱ्यांना मिळतो. उरलेला 65% पेक्षा जास्तीचा पैसा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळत असतो.

मग जर समजा एखाद्या ग्राहकांना बाजारामध्ये मध्ये द्राक्ष खरेदीसाठी जो काही पैसा दिला त्या पैशामध्ये कुणाला किती पैसा मिळतो हे जर पाहायचं झाल तर, आरबीआय ने तेही सांगितल ग्राहकांना द्राक्ष खरेदीसाठी दिलेल्या एकूण पैशापैकी किंवा किमतीपैकी आपल्या शेतकऱ्याला केवळ 35.7% पैसा मिळतो व्यापाराला 26.2% घाऊक विक्रेत्याला मात्र 25% आणि किरकोळ विक्रेत्याला 13.1% पैसा मिळतो. यातही सर्वाधिक कमी पैसा जास्त खर्च करून जास्त मेहनत घेऊन आपल्या शेतकऱ्याला मिळतो तर कमी मेहनतीत सुद्धा आपल्या व्यापारी आणि विक्रेत्यांना जास्त पैसा मिळत असतो.

आता भाजीपाला आणि फळं हे नाशिवंत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐवजी जास्तीत जास्त पैसा म्हणजे ग्राहकांना जेवढी किंमत दिली जेवढा पैसा दिला त्यापेक्षा जास्तीत जास्त वाटा हिस्सा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना जातो. आणि शेतकऱ्यांना कमी मिळतो असं आरबीआय ने म्हटलेलं आहे. परंतु कडधान्यामध्ये सर्वाधिक जास्त वाटा म्हणजे ग्राहकांना दिलेल्या एकूण किमतीपैकी किंवा पैशापैकी जास्त पैसे हे शेतकऱ्यांना मिळतात असं आरबीआय ने स्पष्ट केलय.

आरबीआयचं म्हणणं आहे की ग्राहकांना शेतीमाल खरेदी करताना दिलेल्या किमतीतील हिस्सा कडधान्य उत्पादकांना जास्त मिळतो म्हणजेच हा हिस्सा फळ आणि भाजीपालाच्या तुलनेमध्ये जास्त असतो. आरबीआय ने म्हटलं की हरभराच्या मूल्य साखळीत ग्राहकांना दिलेल्या किमतीपैकी सर्वाधिक म्हणजेच 75% पैसा शेतकऱ्यांना मिळतो. तर उरलेला 25% पैसा म्हणजे हिस्सा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळतो. आता तुरीच्या बाबतीत देखील त्यांनी असंच म्हटलंय आरबीआय ने आपल्या अवालात असं म्हटलंय की तुरीच्या किमतीतील 65% शेतकऱ्याला मिळतात आणि उरलेले 35% पैसे किंवा हिस्सा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळत असतो मुगासाठी ग्राहकांना दिलेल्या किमतीपैकी किंवा पैशापैकी 70% पैसे किंवा हिस्सा हा शेतकऱ्यांना मिळतो तर 30% व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळत असतात

थोडक्यात काय तर आरबीआयच असं म्हणणं आहे की, कडधान्यामध्ये जी काही किंमत ग्राहक खरेदीसाठी देत असतो. त्यापैकी जास्तीत जास्त वाटा हा ग्राहकांपर्यंत पोहोचतो. आणि व्यापारी आणि विक्रेत्यांना कमी पैसा मिळतो. त्या तुलनेमध्ये भाजीपाला आणि फळ यांच्या बाबतीमध्ये उलटं आहे. सर्वाधिक कमी पैसा हा शेतकऱ्यांना मिळतो. जास्त पैसा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळतो असं आपल्या अहवालामध्ये स्पष्ट केलं. आता तुम्हाला काय वाटतं खरंच आपल्या सोबत असं घडतंय का?

कडधान्यामध्ये खरंच शेतकऱ्यांना व्यापारी आणि विक्रेत्यांच्या तुलनेमध्ये जास्त पैसा मिळतो का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटुयात पुढच्या लेखात.

Exit mobile version