Digi Marathi

टरबुज किंवा खरबुज कोणते फळ तुम्हाला उन्हाळ्यात ठेवेल ताजेतवाने…

तस पहायला गेल की, टरबुज आणि खरबुज दोन्हीही फळ ही उन्हाळ्यात उपलब्ध होणारी सिझनल फळे आहेत. दोन्हीही फळे चवदार आणि गोड असतात. तसेच या फळांत पाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे, उन्हाळयात आपल्या शरीराला आवश्यक असणारी पाण्याची गरज ही फळे चांगल्या प्रमाणात भागवतात.

टरबुज

टरबुज हे भारतात तसेच आपल्या महाराष्ट्रात अतिषय असे लोकप्रिय फळ आहे. लालबुंद आणि गरेदार असल्यामुळे टरबुज हे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. तसेच यामध्ये पाण्याचे प्रमाण हे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त्‍ असल्यामुळे सुध्दा उन्हाळ्यात या फळाला खुप मागणी असते.

टरबुजामध्ये व्हिटामिन सी आणि ॲमीनो ॲसीडसह मोठ्या प्रमाणात ॲन्टीऑक्सीडंट असतात. जे आपली त्चचा तजेलदार ठेवण्यास मदत करतात तसेच टरबुज खाल्याने आपली पाचणशक्तीही चांगली राहण्यास मदत होते.

टरबुज हे नैसर्गिक गोडपणामुळे उन्हाळ्यात शितपेयास एक चांगला पर्याय म्हणुन टरबुजाकडे बघितले जाते. याचा वापर विविध प्रकारच्या स्मुदी,हायड्रेटींग स्नॅक्स बनवण्यासाठी होत असल्यामुळे उष्णतेवर मात करु पाहण्यांसाठी हा एक चांगला पर्याय म्हणुन लोकप्रिया फळ आहे.

खरबुज

खरबुज हे चवीने गोड तसेच याचा गर हा हलका नांरगी किंवा हलका हिरवा असतो. या फळाला बाहेरील देशात मस्कमेलन किंवा कॅन्टालुप देखील म्हणतात. खरबुजामध्ये व्हिटामिन ए व सी चे प्रमाण अधिक असते. जे आपली त्वचा तसेच दृष्टी चांगली राखण्यास मदत करते. तसेच जर आपण आपल्या रोजच्या आहारात खरबुजाचे सेवन करत असु तर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास सुध्दा हे फळ मदत करते.

खरबुज हे सुध्दा आपल्याला ताजेतवाने राहण्यास तसेच यामध्ये असललेल्या फायबर मुळे आपली पाचणशक्तीसुध्दा चांगली राखण्यास मदत करते. तसेच यामध्ये असलेल्या ॲन्टीऑक्सीडंट्स आपल्याला फ्री रॅटकल्सविरुध्द लढण्यास मदत करते.

टरबूज आणि खरबुजाच्या लढाईत, जेव्हा हायड्रेशनचा प्रश्न येतो तेव्हा कोणतेही फळ हे स्पष्ट विजेता नाही. दोन्ही फळे विविध आरोग्य फायद्यांसह आपल्याला ताजेलदार ठेवतात. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण थोडे जास्त असते, तर खरबुजामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात जे एकूण आरोग्यासाठी योगदान देतात. तुमच्या आहारात विविध प्रकारच्या हायड्रेटिंग फळांचा समावेश केल्याने पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थाचे सेवन सुनिश्चित होते आणि उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. मग का निवडायचे? उन्हाळ्याच्या उष्णतेला उत्साहाने पराभूत करण्यासाठी विविध हंगामी फळे खाऊन दोन्ही जगातील सर्वोत्तम गोष्टींचा आनंद घ्या!

Exit mobile version