Digi Marathi

कोरोनामध्ये कोणती लस घेतलीय…ही असेल तर आत्ताच सावधान व्हा.

AstraZeneca ची लस जी भारतात कोव्हीशील्ड म्हणुन कोरोणा काळात भारतीयांना देण्यात आली,तीच्या बाबात खळबळजनक माहिती बाहेर आली आहे.

जागतिक दिग्गज फार्मास्युटीकल कंपनी AstraZeneca  कंपनीने म्हटले आहे की,त्यांची कोव्हीडविरोधी लस AZD1222 जी भारतात कोविशील्ट म्हणुन भारतात बनवण्यात आली होती. तिच्याबाबतीत आता खळबळजनक माहिती समोर आलेली असुन कंपनीने या लसीमुळे थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) तसेच शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे, यासारख्या दुर्मिळ आजार होत असल्याची बाब स्वीकारली आहे.

AstraZeneca ने या लसीचा फॉर्म्युला पुणेस्थित लस निर्माता कंपनी सीरम इस्टिट्युट ऑफ इंडिया(SII) ला कोविशील्डच्या निर्मितीसाठी कारोनाकाळात ही लस बनविण्यासाठी परवाना दिला होता. COVISHEILD चे 175 कोटी पेक्षा जास्त डोस भारतात दिले गेले आहेत.

काय कारण आहे की AstraZeneca ने याबाबतची आपली चुक स्विकारली आहे आणि खरच कोव्हीशिल्ड घेतलेल्या भारतीयांनी याची काळजी करण्याचे कारण आहे का?

AstraZeneca ने नेमके काय म्हटले आहे?

युनायटेड किंगडममध्ये कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खटल्यानंतर ॲस्ट्राझेनेकाने कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये TTS बद्दल सांगितले. 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केलेल्या लसीशी संबंधित आरोग्यविषयक दाव्यांवर फार्मास्युटिकल कंपनीवर खटला भरला जात आहे.

Thrombotic Thrombocytopenic Syndrome (TTS) म्हणजे काय व त्याची लक्षणे काय आहेत. ?

थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) हा एक दुर्मिळ परंतु गंभीर असा आजार आहे ज्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे  आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होणे असे प्रकार उद्भवतात.

टीटीएसशी अनेक लक्षणे आहेत, ज्यामध्ये दम लागणे, छाती किंवा हातपाय दुखणे, इंजेक्शनच्या जागेभोवताली असलेल्या भागात लाल ठिपके किंवा त्वचेवर जखम होणे, डोकेदुखी, शरीराच्या अवयवांमध्ये सुन्नपणा इत्यादींचा समावेश होतो. तसचे दुर्मिळ प्रकारामध्ये रक्त गोठण्यामुळे रक्तप्रवाहात प्रतिबंध अशाप्रकारची लक्षणेसुध्दा दिसु शकातात.

भारतियांनी खरच Thrombotic Thrombocytopenic Syndrome (TTS) ला घाबरण्याचे कारण आहे काय?

WHOने म्हटले आहे की, त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार कोविशिल्डमुळे TTS चा धोका हा अत्यंत कमी असुन, लस देण्यात आलेल्या लोकांमध्ये अडीच लाखांमध्ये एक TTS रुग्ण सापडण्याची शक्यता ही WHO ने वर्तविली आहे. त्यामुळे भारतीयांनी जास्त घाबरुन न जाता, लक्षणे आढळल्या लवकरात लवकर उपचार घेण्याची खबरदारी वर्तविण्यात आलेली आहे.

Exit mobile version