Digi Marathi

कसुरी मेथीच्या लागवडीच्या फायदे आणि प्रक्रिया.

नमस्कार शेतकरी मित्रांनो. रब्बी हंगामात महाराष्ट्रात येऊ शकणाऱ्या पिकांमध्ये कसुरी मेथी या सुगंधी मसाला पिकाचाही समावेश होतो. पण या पिकाबद्दल शेतकऱ्यांना माहिती नाही. आणि त्याप्रमाणात जनजागृती झालेली नाहीये.

नमस्कार शेतकरी मित्रांनो. रब्बी हंगामात महाराष्ट्रात येऊ शकणाऱ्या पिकांमध्ये कसुरी मेथी या सुगंधी मसाला पिकाचाही समावेश होतो. पण या पिकाबद्दल शेतकऱ्यांना माहिती नाही. आणि त्याप्रमाणात जनजागृती झालेली नाहीये.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्राच्या, माध्यमातून विदर्भात मूर्तिजापूर पुसद आणि अकोला तालुक्यात शेतकरी गटाच्या माध्यमातून कसुरी मेथीची लागवडीचे प्रयोग घेण्यात आले. या प्रयोगातून गटांतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना 10 गुंठ्यातून खर्च वजा जाऊन एक ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळालय.

कसुरी मेथी लागवडीसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. कसुरी मेथीला भाव काय मिळतो. आणि प्रक्रियेविषयी आपण या लेखात बघणार आहोत. कसुरी मेथीच्या वाळलेल्या पानाचा उपयोग हा पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढविण्यासाठी केला जातो. त्यामुळे कसुरी मेथीला हॉटेल व्यवसायात कॅटरिंग आणि घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे पीक एकरी घेण्यासारखं नाही त्यामुळे पाच गुंठे 10 गुंठे इतक्या कमी जागेत कसुरी मेथीच उत्पादन घेता येत.

या पिकाला जंगली जनावरांचा त्रासही नाही. आपण भाजी म्हणून खातो ती मेथी आणि कसुरी मेथी यातील फरक सांगायचा झाला. तर कसुरी मेथीची पाने सुवासिक असली, तरी साध्या मेथी प्रमाणे ती कच्ची खाता येत नाहीत.

कसुरी मेथीच्या पानात आणि देठात ट्रायगोनिल नावाचा सुगंधी पदार्थ असतो त्यामुळे कसुरी मेथीला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो. कसुरी मेथीच बियाण हे साध्या मेथी पेक्षा लहान असत तर झाडाला लागणाऱ्या शेंगा या बियासारख्या वाकड्या असतात. कसुरी मेथीला साध्या मेथी पेक्षा जास्त फांद्या असतात.

तुम्हाला जर कसुरी मेथीची लागवड करायची असेल तर तुमच्याकडे पाण्याची सोयी असायलाच पाहिजे. कारण या पिकाला वर्षभर पाण्याची गरज असते. खूप भारी किंवा खूप हलकी जमीन न निवडता पोयट्याची पाण्याचा निचरा होणारी चुनखडी युक्त जमीन लागवडीसाठी योग्य मानली जाते.

लागवड ऑक्टोबर मध्ये करावी कसुरी मेथीच्या कसुरी सिलेकन आणि के एफ 25 या जाती उपलब्ध आहेत. लागवडीपूर्वी बियाण्याला 2gm थायरमची प्रक्रिया प्रति किलो बियाणे या प्रमाणात करावी लागते. बियाणे खूप लहान असल्यामुळे बियाणे रेती समप्रमाणात मिसळून पेरावे. नंतर 30 बाय 30cm अंतरावर लागवड करावी. काही ठिकाणी वाफे करून फेकी पद्धतीने सुद्धा लागवड करता येते.

कसुरी मेथीची जर एक एकर वर लागवड करायची असेल तर 400gm बियाणे लागते. आणि खत व्यवस्थापन करताना जमिनीची सुपीकता लागवडीचा हंगाम आणि जाती यानुसार खतांचे प्रमाण ठरवाव लागत.

लागवडीच्या वेळी 25 किलो नत्र आणि 25 किलो नत्र लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावे. पिकाची एकसारखी उगवण होण्यासाठी पेरणीनंतर लगेच पाणी द्याव. पिकाच्या फुलोरा अवस्थेच्या अगोदर म्हणजेच पेरी नंतर 40 ते 45 दिवसानंतर फांद्या फुटण्यास सुरुवात होते. या काळात पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये कसुरी मेथीवर पांढरी माशी या किडीचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यावर वर योग्य वेळी उपाय करावे लागतात.

कसुरी मेथीची वेळेवर काढणी करणे देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पाने आणि फांदीच्या मधील भागाला विशिष्ट प्रकारचा वास येतो तेव्हाच कसुरी मेथीची काढणी करावी लागते. कसुरी मेथीच्या पानात आणि देठात ट्रायगुलीन नावाचा सुगंधी पदार्थ लागवडीपासून 60 ते 70 दिवसांपासून तयार होतो.

त्यानंतर पिकाला फुले येतात फुले लागल्यानंतर कसुरी मेथीचं आर्थिक मूल्य कमी होत. त्यामुळे कसुरी मेथी वेळेवर काढणी करण अत्यंत गरजेच आहे. त्यासाठी पाने आणि देठाचा वास घ्यावा विशेष म्हणजे पानांची म्हणजेच फांद्यांची एकापेक्षा जास्त वेळी काढणी करता येते.

लागवडीपासून साधारणपणे 40 ते 50 दिवसांनी कसुरी मेथीच्या पानांची काढणी करावी. त्याचप्रमाणे पुन्हा 40 ते 45 दिवसांनी दुसरी काढणी करावी. कसुरी मेथीच बीज उत्पादनही घेता येत. पीक 115 ते 120 दिवसांचा झाल्यानंतर शेंगा तपकिरी होतात 60 ते 70 टक्के शेंगा तपकिरी झाल्यानंतर शेंगांची काढणी करावी.

शेंगा सात ते आठ दिवस सुकल्यानंतर काठीने बडवून बियाणे वेगळे करावे साधारणपणे हेक्टरी चार ते पाच क्विंटल बियाणे मिळते. कसुरी मेथीचा हा उपयोग प्रोसेसिंग केल्यानंतरच आहे त्यामुळे पाला काढल्यानंतर पाने स्वच्छ धुऊन त्यावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया केलेली पाने नंतर उन्हात किंवा ड्रायर मध्ये वाळवली जातात.

100 kg पाल्यापासून साधारणपणे 8 ते 9 kg वाळलेला पाला मिळतो. हा वाळलेला पाला वजन करून व्यवस्थित पॅक करून विकावा लागतो. मसाला उद्योगातील अनेक नामवंत कंपन्या या पाल्यावर प्रक्रिया करून कसुरी मेथीची आकर्षक पॅकिंग करून विक्री करतात.

या सुगंधी कसुरी मेथीला साधारणपणे प्रति ग्रॅम एक रुपया असा भाव मिळतो. म्हणजेच आठ किलो जरी पाला मिळाला तरी 80 हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळू शकतो. त्यामुळे जास्त फायदा मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी स्वतः प्रक्रिया करून कसुरी मेथीची विक्री करायला पाहिजे.

पण या पिकाबद्दल तेवढ्या प्रमाणात जनजागृती झालेली नाहीये त्यामुळे आपले शेतकरी कसुरी मेथी लागवडीकडे वळत नाहीत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत शेतकरी गटामार्फत कसुरी मेथी लागवड तंत्र आणि प्रक्रिया तंत्राचा प्रसार केला जात आहे.

रब्बी हंगामासाठी अतिशय कमी जागेत येऊ शकणाऱ्या कसुरी मेथीचा विचार तुम्ही करू शकता. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा.

Exit mobile version