नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या महाराष्ट्राला केंद्र शासनाच्या माध्यमातून 1492 कोटी रुपयांचा निधी हा अग्रिम स्वरूपामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या महाराष्ट्राला केंद्र शासनाच्या माध्यमातून 1492 कोटी रुपयांचा निधी हा अग्रिम स्वरूपामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
एनडीआरएफ एसडीआरएफ च्या निधी मधून 5858 कोटी रुपये हे 14 राज्यांना देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच्याच पैकी सर्वाधिक असा 1492 कोटी रुपयांचा निधी हा महाराष्ट्राला अग्रिम स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेला आहे.
शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2024 मध्ये देशातील नुकसानग्रस्त झालेल्या 14 राज्यांना ज्याच्यामध्ये महाराष्ट्राला 1492 कोटी,आंध्रप्रदेशला 1036 कोटी,आसामला 716,बिहारला 655,गुजरातला 600 कोटी,हिमाचल प्रदेशला 189 कोटी,केरळला 145 कोटी,मणिपूरला 50 कोटी,मिझोरमला 21 कोटी,नागालँडला 19 कोटी,सिक्कीमला 23 कोटी,तेलंगणाला 416 कोटी,त्रिपुराला 25 कोटी तर पश्चिम बंगालला 468 कोटी असे एकूण या पूर परिस्थितीमुळे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 14 राज्यांना 5858 कोटी रुपयांचा निधी हा केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे.
मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की 14958 कोटी रुपयांचा निधी हा केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये दुष्काळामुळे बाधित झालेल्या कर्नाटकला सर्वाधिक साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला होता महाराष्ट्रासाठी रक्कम वितरित करण्यात आलेली नव्हती,परंतु आता सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्याला हा अग्रिम स्वरूपामध्ये म्हणजे आगाऊ स्वरूपामध्ये 1492 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.
ज्याच्यामुळे आता राज्यातील पूर्व परिस्थिती अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे, तर मित्रांनो अशाप्रकारे हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद.