अतिषय उच्च तापमान,दमट वातावरण,तुफानी वाऱ्यामुळे तसेच उन्हाळ्यातील ताण पाळीव जनावरांच्या शारीरवर व त्यांच्या पाचन प्रक्रियेत बदल घडवुन आणतो.
Effects of Climate Change on Husbandry Animals : आजाकाल होत असलेल्या वातावरणातील तापमाण बदलामुळे उन्हाळ्यात जनावरांच्या शरीरावर तसेच त्यांच्या पाचन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहेत. तसेच उन्हाळ्याच्या ताणामुळे उत्पादन,पुनरुत्पादनावर सुध्दा परिणाम होत आहेत.
जास्त उष्णतेमुळे जनावरांच्या शरीराचे तापमाण वाढते. त्यामुळे त्यांचा रक्तप्रवाह वाढातो परिणामी जनावरे कमी खाद्य खातात आणि पाणि पिण्याचे प्रमाण वाढते. याचा परिणाम दुध उत्पादनावर होऊन उत्पादनात घट होते. तसेच उन्हाळ्यात दुभत्या जनावरांना स्तनदाहाचा प्रादुर्भाव होतो तसेच माजाच्या प्रक्रियेवर सुध्दा विपरीत परिणाम होते ज्यामुळे जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. नर जनावरांची विर्य गुणवत्ता कमी होते. तसेच मादेचे बिजांड व गर्भधारणेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
जनावरांचा गोठा स्वच्छ नसल्यास पावसाळ्यात अमोनिया सारख्या रसायनाची निर्मिती होते. त्याचा परिणाम जनावरांच्या डोळ्यावर होतो, गोठ्यामधून पाण्याच्या गळतीमुळे कोक्सीडीओसीस होऊ शकतो.जमिनीवर असलेल्या ओलाव्यामुळे अनेक जीवाणु निर्माण होतात त्यामुळे जनावरे आजारी पडतात.
गोचीडासारखे बाह्य परजीवी जनावरांच्या शरीराचा चावा घेतात, त्यामुळे थायलेरियोसीस सारखे आजार होतात.
अस्वच्छ व्यवस्थापन व घाणेरड्या गोठयामुळे कासेचे आजार मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे कासेला सूज येते, दुधात गाठी येतात, दुधातील उत्पादनावर आणि गुणवत्तेवर परिणाम होतो.
गोठयाचे व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे हिवाळ्यात जनावरांना थंडी वाजते परिणामी शरीरातील तापमान संतुलन राखण्यासाठी अधिक ऊर्जेचे गरज असते. उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी त्यांना अधिक पोषक खाद्याची गरज असते. जास्त थंडीमुळे न्युमोनिया किंवा श्वसनाचे आजार जास्त प्रमाणात होतात, त्यामुळे दूध उत्पादन, आरोग्य, पुनरुत्पादनवर परिणाम होतो.
जनावरांना सकस आहार मिळाला नाही तर
चयापचयाचे विकार होतात. दुग्धज्वर, कीटॉसिस,
वातावरणातील तापमान कमी झाल्यास वासराला शरीरातील तापमान नियमनासाठी अधिक ऊर्जेची गरज असते. उर्जेचा जास्त वापर झाल्यामुळे वासराचे वजन आणि रोगप्रतिकरक्षमता कमी होते.
गोठ्यातील जागा ओलसर असेल तर जनावरे, वासरे आजारी पडतात. थंड हवामानात जन्मलेल्या वासरांची, करडांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते, त्यामुळे त्यांना हायपोथर्मिया होतो. यामुळे त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो.
थंडीच्या काळात सकाळच्या वेळेस जनावरांचे स्नायू आखडतात, त्यामुळे जनावरे लंगडते. थंडीचा जनावरांच्या त्वचेवर परिणाम होतो. कास खडबडीत होऊन तिला भेगा पडून जखमा होऊन कासदाह होतो. परिणामी दुधउत्पादन कमी होते.