Digi Marathi

सनातन रक्षक दलाकडून साईबाबांच्या मूर्ती हटवल्यात ? Hindu-Muslim वादाला नवीन तोंड?

उत्तर प्रदेश पुरती मर्यादित असलेली हिंदुत्ववादी संघटना असलेल्या सनातन रक्षक दलाच्या काही लोकांनी रविवारी वाराणसीत प्रसिद्ध मंदिर असलेल्या बडा गणेश मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवली.

नमस्कार मित्रांनो सध्या उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत एका नव्या वादाला तोड फुटलय वादाच कारण अस की, उत्तर प्रदेश पुरती मर्यादित असलेली हिंदुत्ववादी संघटना असलेल्या सनातन रक्षक दलाच्या काही लोकांनी रविवारी वाराणसीत प्रसिद्ध मंदिर असलेल्या बडा गणेश मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवली.

वाराणसीतल्या लोहाटी या भागात असलेले हे मंदिर ऐतिहासिक आहे दररोज इथ हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात रविवारी नेहमीप्रमाणे इथं भाविक दर्शनासाठी आले होते,यावेळी सनातन रक्षक दलाचे काही लोक या मंदिर परिसरात एकत्र आले आणि त्यांनी पाच मंदिरांमध्ये फूट उंचीच्या साईबाबांच्या मूर्तीला पांढऱ्या कपड्याने झाकल मंदिरातून त्यांनी ही मूर्ती हटवली आणि मंदिराच्या बाहेर आणून ठेवली. अशाच प्रकारे त्यांनी काशी पुरुषोत्तम मंदिरातली मूर्ती हटवली यानंतर साईबाबांची मूर्ती हटवण्याचे प्रकार वाढत गेले. मंगळवारपर्यंत या संघटनेनं वाराणसीतल्या तब्बल 14 मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवल्या आहेत.

यानंतर साई भक्तांमध्ये नाराजी पसरली आणि वाराणसीत तणावाची स्थिती निर्माण झाली,पण सनातन रक्षक दल साईबाबांची मूर्ती का हटवतय तर साईबाबांची पूजा करण्यात यावी याबाबत सनातन धर्मात कोणतीही नोंद नाही. तसेच धर्मग्रंथांमध्येही त्यासंबंधी चा उल्लेख नाहीये,असा दावा सनातन रक्षक दलाने केला आहे.

त्यातच तिथल्या महंतांनीही त्यांची पाठराखण केली आहे साईबाबा हे धार्मिक गुरु किंवा पीर असू शकतात परंतु देव असू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या देवी देवतांच्या मूर्ती मंदिरातून काढून त्या जागी साईबाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणं चुकीचं आहे. अस मत सिद्धी हनुमानगडीचे महंत राजोदास यांनी व्यक्त केलंय.

सनातन धर्मासाठी वाराणसी शहर पवित्र मानलं जात. या पवित्र शहरात साईबाबांची पूजा करण हिंदू धर्मशास्त्राच्या विरोधात आहे अस म्हणत सनातन रक्षक दलान या मूर्ती हटवल्या आहेत. पण साईबाबांच्या पूजेला विरोध होण्याची ही पहिलीच वेळ नाही 10 वर्षांपूर्वी 2014 मध्ये साईबाबांच्या पूजेला विरोध झाला होता. याच वादाची किनार सध्याच्या वादाला असल्याचं सांगितलं जातंय.

2014 मध्ये शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी हरिद्वार मधल्या कणखल इथ भारत साधू समाजाची धर्मसंस्था बोलावली होती,या कार्यक्रमात शंकराचार्य स्वरूपानंद यांनी साईबाबा मुस्लिम असल्याचं म्हणलं होत. साईबाबा हे मुस्लिम फकीर होते त्यांची हिंदू देवतांची तुलना करू नये तसच हिंदूंनी त्यांची पूजाही करू नये.

शिर्डीत बांधलेल्या साईबाबांच्या समाधीवरून ते मुस्लिम असल्याचं सिद्ध होतं कारण हिंदू धर्मात सांगितलेली समाधी गोल आकाराची असते. तर मुस्लिमांमध्ये समाधी लांब आकाराची असते ज्या ठिकाणी साईंची समाधी बांधण्यात आली आहे तिथं मूर्ती ही बसवण्यात आली आहे त्यामुळे साईबाबा हे मुस्लिम असल्याचं सिद्ध होत. असा युक्तिवाद शंकराचार्यांनी केला होता. तेव्हाही यावरून वाद उभा राहिला होता.

यानंतर मधल्या काळात बऱ्याचदा साईबाबा हिंदू होते की मुस्लिम होते यावरून अनेकदा वाद झाले होते. काही दिवसांपूर्वी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनीही साईबाबांच्या पूजेला विरोध केला होता त्यांनी साईबाबांचा उल्लेख चांद मिया असा केला होता.

आता वाराणसीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलंय शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. इथल्या हिंदुत्ववादी संघटनांनी हटवण्याच्या प्रकरणाचा निषेध नोंदवलाय जे लोक अस कृत्य करत आहेत ते अज्ञानातून करत आहेत..

साईबाबांना सर्वात जास्त मानणारा वर्ग हा हिंदूच आहे अशा घटनांमुळे हिंदू समाजात दुफळी निर्माण होत असल्याचेही काही हिंदुत्ववादी संघटनांनी म्हटलय.

परंतु साईबाबा हिंदू होते की मुस्लिम यावरून काय वाद आहे तेही पाहूयात. तर सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या धर्माबाबत आणि जन्मस्थळाबाबत वेगवेगळे दावे केले जातात काहींच्या मते साईबाबांचा जन्म महाराष्ट्रात आपल्या परभणी जिल्ह्यातल्या पाथरी गावात झाला तर काहींच्या मते साईबाबांचा जन्म शिर्डीत झाल्याचं सांगितल जात. पण याबाबत सबळ पुरावे आजपर्यंत पुढे आलेले नाहीत.

असेही सांगितल जात छत्रपती संभाजीनगर कडून नांदेडकडे रेल्वेने जात असताना मानवत रोड नावाच रेल्वे स्टेशन लागत इथ मागच्या अनेक वर्षांपासून एक बोर्ड लावण्यात आलाय त्यावर साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीला जाण्यासाठी इथ उतराव अस लिहिण्यात आलेल आहे. त्यामुळे पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थळ आहे अशी पाथरीकरांची आणि त्यावर भागातल्या लोकांची श्रद्धा आहे.

पण साईबाबांचा बराचसा काळ हा शिर्डीत गेला आहे त्यामुळे त्यांचा जन्मस्थान शिर्डीच आहे असा एक दावा केला जातो. पण गोविंद दाभोलकर यांनी लिहिलेल्या आणि 1974 ला शिर्डी साई संस्थांना छापलेल्या साई सतचरित्राच्या आठव्या आवृत्तीमध्ये साईबाबांचा जन्म पाथरीमध्ये झाल्याच नमूद आहे. माझ्या आई-वडिलांनी मला एका फकीराच्या झोळीत टाकल्याच साईबाबांनी आपले शिष्य माळसापती यांना सांगितल होत. असा उल्लेख यात आहे पण त्याआधीच्या आवृत्त्यांमध्ये असा उल्लेख नाहीये त्यामुळे साईबाबांचा धर्म त्यांचा जन्मस्थळ याबाबत संभ्रम असल्याची चर्चा होते.

आपल्या समाज माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार साईबाबा यांच खर नाव हरिबाबू भुसारी असल्याच सांगितल जात तर त्यांच्या आईच नाव देवकी अम्मा आणि वडिलांच नाव गोविंद भाऊ अस सांगितल जात.

काही लोक साईबाबांच्या वडिलांना गोविंद भाऊ ऐवजी गंगाभाऊ म्हणायचे आईला देवगिरी अम्मा या नावाने ओळखायचे देवगिरी यांना पाच मुल होती रघुपत भुसारी,दादा भुसारी,हरिबाबू भुसारी,अंबादास भुसारी आणि बळवंत भुसारी अशी त्यांची नाव साईबाबा म्हणजेच हरिबाबू भुसारी हे गंगाभाऊ आणि देवगिरी अम्मा यांचे तिसरे पुत्र होते.

आता त्यांना मुस्लिम नाव जोडण्यामागे एक स्टोरी सांगितली जाते साईबाबांच्या वडीलोपार्जित घराजवळ एक मुस्लिम कुटुंब राहत होत. त्या कुटुंबाच्या प्रमुखाचं नाव चांद मिया होत त्यांच्या पत्नीच नाव चांद बेबी होतं त्यांना मूलबाळ नव्हते.

अस सांगितलं जात यावेळी हरिबाबू म्हणजे साईबाबा त्यांचा बराच वेळ चांद यांच्या घरी घालवायचे चांद बेबी ही हरिबाबूंना आपला मुलगा मानायच्या. इथूनच साईबाबांना चांदमिया म्हटल जायच अशीही पुष्टी ही जोडली जाते. तसच शिर्डीला आल्यानंतर साईबाबा आपल्या आयुष्याचा बराच काळ मशिदीत राहत होते इथच ते गोल टोपी घालायचे सुफी धर्माचं ज्ञान द्यायचे तसंच त्यांना पुराण आणि भगवद्गीतेचेही ज्ञान होत.

असही सांगितलं जातं शिर्डीत आल्यानंतर ते ज्या मशिदीत राहत होते नंतर त्या मशिदीच नामकरण द्वारकामाई अस करण्यात आल. साईबाबांच्या सुरुवातीच्या जीवनाबाबत अनेक संभ्रम आहेत. वेगवेगळ्या चरित्रांमध्येही त्यांच्या जन्मस्थळाबद्दल वेगवेगळे दावे करण्यात आलेत सबका मालिक एक हीच त्यांची शिकवण असल्यानं त्यांनीही कधीही आपल्या सुरुवातीच्या जीवनाबाबत फारसा खुलासा केला नाही.

असही सांगितलं जात की, साईबाबा म्हणजेच नानासाहेब पेशवे होते असा दावाही करण्यात येतो पण साईबाबांच्या जन्माबाबत असलेल गुड आणि नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूबद्दल असलेल गुड या दोन गोष्टींमधून हा संबंध जोडला जातो. कारण या गोष्टी खऱ्या असत्या तर साईबाबांनी आपल्या आयुष्यात कधीतरी पत्रव्यवहार केला असता. पण तसं काहीही आढळून आलं नाही. त्यामुळे या फक्त अफवा असल्याचं स्पष्ट होत.

सध्या घडत असलेल्या प्रकारावरही शिर्डी संस्थानाकडून साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये राम जन्मोत्सव सुरू केला नारदीय कीर्तनाची परंपरा सुरू केली. दक्षिणेतले बरेच भाविक साईबाबांना दत्ताच्या रूपात पाहतात. साईबाबांच्या उत्सवासाठी पंढरपूरच्या धरतीवर पाई वाऱ्या शिर्डीमध्ये येतात त्यामुळे वास्तव समजून न घेता वाराणसी मध्ये गैरप्रकार सुरू आहेत. अस मत व्यक्त करण्यात येतय.

पण साईबाबांचं मूळ माहित नसणं आणि त्यांचा जन्मस्थळ धर्म याबद्दल असलेल्या संभ्रमामुळे त्यांच्या धर्मावरून सुरू असलेल्या वादाला पुन्हा तोंड फुटलय. वाराणसीत साईबाबांच्या मूर्ती आठवण्याचं प्रकरण आणि त्यावरून सुरू असलेल्या वादाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये आम्हाला जरुर सांगा

Exit mobile version