नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील सोयाबीन मूग आणि उडीद या तिन्ही पिकाची हमीभाव खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.
नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील सोयाबीन मूग आणि उडीद या तिन्ही पिकाची हमीभाव खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.
पुढील तीन महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यातील सोयाबीन मूग आणि उडीद या तिन्ही पिकाची हमीभाव खरेदी केली जाणार आहे. ज्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून नाफेड आणि एनसीसीएफ ला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे.
या दोन्ही एजन्सीच्या माध्यमातून राज्यातील जवळ जवळ 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन 17000 मेट्रिक टन मूग आणि एक लाख आठ हजार मेट्रिक टन उडदाची हमीभाव खरेदी केली जाणार आहे. आणि याच्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून राज्यामध्ये जवळजवळ 210 हमीभाव खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच हमीभाव खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांना सोयाबीन मूग आणि उडीदच्या खरेदीसाठी नोंदणी करण्याचं आव्हान केलं जात आहे.
मित्रांनो याच्यामध्ये नाफेडच्या माध्यमातून जवळजवळ 147 तर एनसीसीएफच्या माध्यमातून 63 हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये आपण जर पाहिल तर 10 ऑक्टोबर पासून मूग आणि उडदाची हमीभावानं प्रत्यक्षामध्ये खरेदी केली जाणार आहे. तर 15 ऑक्टोबर 2024 पासून सोयाबीनची हमीभावान. खरेदी केली जाणार आहे.
याच्यामध्ये नाफेडच्या माध्यमातून जी काही खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत याच्यामध्ये सर्वाधिक खरेदी केंद्र ही बीड जिल्ह्यामध्ये 16 तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये नऊ अमरावती जिल्ह्यामध्ये आठ बुलढाणा जिल्ह्यामध्ये 12 धुळे जिल्ह्यामध्ये पाच जळगाव जिल्ह्यामध्ये 14 जालना जिल्ह्यामध्ये 11 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक लातूर जिल्ह्यामध्ये 14 नागपूर जिल्ह्यामध्ये आठ नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन परभणी जिल्ह्यामध्ये आठ पुणे जिल्ह्यामध्ये एक सांगलीमध्ये दोन तर सातारा जिल्ह्यामध्ये एक याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यामध्ये आठ वाशिम जिल्ह्यामध्ये पाच आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सात अशा एकूण या 19 जिल्ह्यांमध्ये 147 हमीभाऊ खरेदी केंद्र हे नापेडच्या माध्यमातून सुरू केले जाणार आहेत.
तर एनसीसीएफ च्या माध्यमातून नाशिक मध्ये सहा अहिल्यानगर मध्ये सात सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 छत्रपती संभाजीनगर मध्ये 11 हिंगोली जिल्ह्यामध्ये नऊ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाच नांदेड जिल्ह्यामध्ये मध्ये 14 अशा प्रकारची हमीभाव खरेदी केंद्र या ठिकाणी एनसीएसएफ च्या माध्यमातून सुरू केली जाणार आहेत मित्रांनो हमीभाव खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठीचा आव्हान केलं जात आहे.
याच्यासाठी जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा सीएससी सेंटर असतील यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या लिंकच्या माध्यमातून शेतकऱ्याची नोंदणी केली जाते. किंवा प्रत्यक्ष नोंदणी केंद्रावरती देखील शेतकऱ्यांची नोंदणी करून घेतली जाते. याच्यामध्ये आपण जर पाहिल तर शेतकऱ्यांना जवळच्या नाफेड किंवा एनसीसीएफ च्या खरेदी केंद्रावरती ही नोंदणी करावी लागणार आहे. ज्याच्यासाठी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना सोयाबीन मूग उडदाची नोंद असलेला सातबारा आधार कार्ड बँकेचा पासबुक अशा प्रकारचे कागदपत्र घेऊन ही नोंदणी करावी लागणार आहे.
नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर हा या ठिकाणी घेतला जाणार आहे. आणि याच मोबाईल नंबर वरती पुढील एसएमएस असतील कॉल असतील हे शेतकऱ्यांना केले जातील. आणि ज्या दिवशी शेतकऱ्याची प्रत्यक्ष खरेदी असेल त्या खरेदीपूर्वी शेतकऱ्याला या ठिकाणी त्या तारखेबद्दल कळवल जाईल. आणि त्या तारखेला शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावरती घेऊन जायचय. आणि अशा प्रकारे आता हे प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुरू झालेल्या आहेत.
तर शेतकऱ्यांची ही पूर्व नोंदणी सुरू झालेली आहे आणि नोंदणी केल्यानंतर दिलेल्या तारखेला 15 ऑक्टोबर 2024 पासून सोयाबीन आणि 10 ऑक्टोबर 2024 पासून मूग आणि उडीद हे खरेदी केलं जाणार आहे. तर मित्रांनो अशाप्रकारे हे सोयाबीन मूग आणि उडीद हमीभाव खरेदी केंद्राच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट होत.
जर ही महिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवानासुध्दा ही माहिती शेअर करयाला विसरु नका. पुन्हा भेटुयात नव्या माहितीसह नव्या लेखात