इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने आता जगाची चिंता वाढवली आहे. इराणने मंगळवारी इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
इस्राईल आणि इराण मध्ये आता संघर्ष पेटलेला असून, इस्राईलने इराण समर्थित हमास हौती आणि हिजमुल्ला या अतिरेकी संघटनांवरती कारवाई सुरू केलेली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणन मंगळवारी इजराईल वरती शेकडो क्षेपणास्त्र डागली. आणि याच्यानंतर इजराईलन सुद्धा इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची धमकी दिलेली आहे.
इराणन आमच्यावरती क्षेपणास्त्र डागून गंभीर चूक केली आहे त्याच्यामुळे आता होणाऱ्या परिणामांना सामोर त्यांना जाव लागेल. असा इशारा इस्राईलन दिला आहे. यात इस्राईलला पाठिंबा देण्याचही अमेरिकेने म्हटलेलं आहे.
म्हणजेच काय येणाऱ्या काळामध्ये इराणला मोठ्या अडचणींना सामोर जाव लागू शकत. याच्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडल जाऊ शकत. इराणमधील जनता आधीच प्रचंड महागाईने त्रस्त आहे.
संघर्षाचा जसा इराण आणि इस्राईल यांच्यावरती परिणाम होणार आहे. तसाच तो भारतावरती सुद्धा निश्चितपणे होणार आहे. भारताला ऊर्जा सुरक्षेसाठी दोन्ही देशांमधले हे युद्ध दोन्ही देशांमधला हा संघर्ष त्रासदायक ठरेल. कारण भारत आपल्या क्रूड ऑइल आणि गॅस याचा मोठा भाग याच प्रदेशातून आयात करतो.
मंगळवारी इराणने इजराईल वरती क्षेपणास्त्र डागली तर त्याच्यानंतर क्रूड ऑइलच्या प्राईसेस या तीन टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. आता इस्राईल कडुन सांगण्यात येत आहे की, आम्ही इराणचा बदला घेणार.अगोदर इराण म्हणत होता आम्ही इस्राईलचा बदला घेणार. आता इस्राईल म्हणते आम्ही इराणचा बदला घेणार त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या क्रूड ऑइलच्या प्राईसेस अजून वाढू शकतात.
सध्या ते 75 76 डॉलर प्रति बॅरल पर्यंत आलेला आहे. असं सांगितल जातंय की, या दोघातल्या युद्धाने जर का गंभीर स्वरूप धारण केल. आणि दोन देशांतील युद्ध जर जास्त दिवस चालल तर या प्राईसेस 100 डॉलर च्या पलीकडे जाऊ शकतात.
भारत क्रूड ऑइल आणि गॅस याच्यासाठी आयातीवरती मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे. आपण सध्या लागणाऱ्या क्रूड ऑइल आणि गॅसची आयात रशीयाकडुन मोठ्या प्रमाणात करतो. त्या पाठोपाठ हे मध्य आशियातले देश की ज्या ठिकाणी क्रूड ऑइलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत,तिथून आयात केली जाते.
जर का या किमती वाढल्या, तर निश्चितपणे आपले इथ महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. आणि इन्फ्लेशन वाढेल आणि याचा आपल्या एकूण इकॉनॉमिक ग्रोथ वरती इम्पॅक्ट होईल असं सांगितल जातय.
आता जेव्हा रशिया वरती संपूर्ण जगाने निर्बंध लादलेले त्यावेळेस रशिया कडून स्वस्थामध्ये क्रूड ऑइल भारताला मिळत राहिल. पण गेल्या काही महिन्यांमध्ये भारतात रशिया कडून क्रूड ऑइल इम्पोर्ट करण याच प्रमाण कमी करुन, मिडल ईस्ट मधून क्रूड ऑइल घेण्याच प्रमाण वाढवण्यात आलेल आहे.
रशिया कडून जे स्वस्थामध्ये क्रूड ऑइल मिळाल तर ते 44 टक्क्यांपर्यंत गेलेलं होत. आपल्या एकूण आयातीच्या पण आता ते प्रमाण 36 टक्क्यांवरती आलेल आहे. तर मिडल ईस्ट मधून जे क्रूड ऑइल मागवलं जात होत ते प्रमाण 40 टक्क्यांवरून 44 टक्क्यांच्या पलीकडे गेलेल आहे.
आता इराक सौदी अरेबिया युएई आणि कुवेत या प्रमुख देशांकडून भारत क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. आता तुम्ही हे म्हणाल की इथ इराण व इस्राईलच नाव नाहीये तरीसुद्धा मग एवढा मोठा इम्पॅक्ट कस काय होईल.
तर जे ऑइल शिपिंग रूट्स आहेत म्हणजे ज्या ठिकाणी उत्पादन होत, म्हणजे इराक सौदी अरेबिया युएई कुवेत आणि कतार या देशात मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत. आणि तिथून ते समुद्रामार्गे भारतामध्ये आणि इतर देशांपर्यंत पोहोचल जात.
तर हा जो इम्पॉर्टंट ऑइल शिपिंग रूट आहे तो लाल समुद्रातून आणि स्ट्रेट ऑफ होमरूज होमरूजची जी खाडी आहे त्या ठिकाणाहून येतो. जर काही फुल स्केल वॉर झालं तर या ठिकाणाहून होणारा सप्लाय हा जो रूट आहे हा पूर्णपणे डिस्टर्ब होऊ शकतो. आणि त्याचमुळे भारतात इंधनाचे दर हे वाढु शकतात. ज्यामुळे आपल्या जनसामन्यांना याची मोठ्या प्रमाणात झळ सोसावी लागु शकते.