जेपी मॉर्गनचे सीईओ जमी डिमन यांच्याकडुन पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरुन कौतुक.

जेपी मॉर्गन चेसचे सीईओ जेमी डिमन यांनी वरील उद्गार हे न्युयॉर्क येथे झालेल्या इकॉनॉमिक फोरममध्ये बोलतानां म्हटले आहे की, त्यांच्याकडे असलेल्या अविश्वसनीय शिक्षण प्रणाली,पायाभुत सुविधा तसेच मोदी यांची असलेली कणखर वृत्ती या गोष्टींच्या जोरावर ते देशाला एका नव्या उंचीवर नेत आहेत. तसेच मोदींनी अलीकडच्या काळात केलेल्या सुधारणांचेही त्यांनी कौतुक केले.

मोदी यांच्या कार्यकाळात 70 कोटी लोकांची बँक खाती उघडण्यात आली असुन त्यांत विविध सरकारी यांजनांच्या देयाकाचा लाभ हस्तांतरीत करण्यात येत असुन,यात कमालीची पारदर्शकता आलेली आहे. तसेच आधार प्रणाली आल्यामुळे भारतातील नागरीकांना एक वेगळी ओळख मिळाली आहे.

68 वर्षीय श्री.डिमन यांनी भारतात असलेल्या अप्रत्यक्ष कर प्रणालीचे कौतुक करतांना म्हटले आहे की, विविध राज्यांत असलेले विविध करामुळे कर प्रणालीत असलेल्या असमानतेमुळे भ्रष्टाचार वाढला होता. परंतु सध्या असलेल्या कर प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध बसलेला आहे. तसेच त्यांनी मोदीच्या कणखर वृत्तीमुळे जुन्या नोकरशाहीला आळा बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *