राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही योजना लागू करण्यात आलेली आहे.
नमस्कार मित्रांनो. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तीन मोफत गॅस सिलेंडर अनुदान योजनेच्या अर्थात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत. ज्याच्यामुळे आता राज्यातील लाखो महिला लाभार्थी या योजनेच्या लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी मदत होणार आहे.
याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत. तर राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही योजना लागू करण्यात आलेली आहे.
ज्याच्या अंतर्गत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या ज्या महिला लाभार्थी आहेत, अशा जवळजवळ 52 लाख 16000 महिला लाभार्थ्यांना डायरेक्टली याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी ज्यांच्या नावावरती गॅसचं कनेक्शन आहे. अशा महिला लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेला आहे.
आणि अशा महिला लाभार्थ्यांना जे काही मोफत गॅस वितरण करण्यात आलेले आहे. त्याचा अनुदान वितरणाची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर वरती त्यांच्या अनुदानाचे पैसे आलेले आहेत. त्यांना मोफत गॅस सिलेंडर वाटप करण्यात आलेले आहे.
परंतु, एकंदरीत राज्यातील परिस्थिती जर आपण पाहिली तर बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन नाहीत .मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे. परंतु, तिच्या पतीच्या सासऱ्याच्या वडिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे. अशा परिस्थितीमध्ये या योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांना या नावावरती गॅस सिलेंडर गॅस कनेक्शन असल्यामुळे या योजनेचा लाभ घेता येत नव्हता.
अशा परिस्थितीमध्ये आता राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनासाठी ठरविण्यात आलेले जे काही निकष होते. जे काही त्याच्या अंतर्गतच्या काही अटीशर्ती होत्या याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. याच्यासाठी आज 4 ऑक्टोबर 2024 रोजी एक महत्त्वाचा असा जीआर निर्गमित करून या योजनेच्या अंतर्गत आता जर, एखाद महिला लाभार्थी जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल आणि अशा महिला लाभार्थ्याच्या नावावरती जर गॅसचं कनेक्शन ट्रान्सफर केल तर त्या महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल. म्हणजे ट्रान्सफर करण्यात आलेल असेल तरी सुद्धा त्या महिला लाभार्थी आता या योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र होणार आहेत.
त्याच्यामुळे पतीच्या नावावरती असलेलं गॅसचं कनेक्शन आता महिलेच्या नावावरती ट्रान्सफर झाल तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची महिला लाभार्थी सुद्धा आता या मोफत गॅस अनुदान योजनेची लाभार्थी होणार आहे. मित्रांनो मोठ्या प्रमाणात याच्यावरती टीका टिप्पण्या करण्यात आलेल्या होत्या की,पुरुषांच्या नावावरती गॅस कनेक्शन येतं महिला काय लाभ दिला जाणार.
निव्वळ बोगस योजना आहे काही फायदा नाही. परंतु,आता या करण्यात आलेल्या बदलामुळे राज्यातील लाखो महिला लाभार्थी पुन्हा एकदा या मोफत गॅस अनुदान योजनेच्या लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी मदत होणार आहे. आपल्या नावावरती जर गॅस कनेक्शन नसेल तर, आपल्या पतीला सांगून किंवा आपल्या वडीलांना सांगून वा आपल्या सासऱ्याला सांगून आता आपल्या नावावरती ते गॅस कनेक्शन करून घ्या. आणि येणाऱ्या काळामध्ये अनुदान योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी पात्र बना धन्यवाद.