पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार.

नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच Digi Marathi या तुमच्या हक्काच्या वेबसाईटवरती ज्यावर तुम्हाला मिळेल तुमच्या महत्वाची बातमी,तर मुळ मुद्दयाकडे वळूयात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. देशभरातील 93 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांच्या 17 व्या हप्त्याचे वितरण जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होते.

आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात 18 व्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे. त्याचा सोहळा या वाशिम जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ऑक्टोबर रोजी दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. पण त्याच सोबत राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पाचव्या हप्त्याचे वितरणही नरेंद्र मोदींच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबर रोजी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेंचं एकत्र असं ₹4000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत.

पीएम किसान योजनेला पात्र असलेल्या शेतकरीच नमो योजनेसाठी पात्र आहेत नमो सन्मान या योजनेचा राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम जिल्ह्यात येणार आहेत, त्याच वेळी त्यांच्या हस्ते 18 व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचाही पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे.

आता त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे या पाचव्या हप्त्यापूर्वीचे हप्ते जमा करण्यात आलेले नाहीत अशा वंचित परंतु पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुद्धा सर्व पाचव्या हप्त्यासह त्यापूर्वीचे हप्तेही जमा करण्यात येणार आहेत,अशी माहिती ही सूत्रांनी दिली आहे. नमो योजनेचा पाचवा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे.

त्या संदर्भातला शासन निर्णय ही 30 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने प्रसिद्ध केलाय. या शासन निर्णयानुसार ऑगस्ट ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतला पाचवा हप्ता वितरित करण्यासाठी येणार आहे. त्यासाठी 2255 कोटी रुपयांच्या वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्याचा लाभ 91 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. याच शासन निर्णयात पहिला,दुसरा,तिसरा,चौथा अशी सर्व हप्ते हे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे हप्ते प्रलंबित राहिलेले आहेत. अशा शेतकऱ्याना पाचव्या हप्त्यासोबत मागील प्रलंबित हप्ते जमा करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचंही स्पष्ट करण्यात आलय. यापूर्वी परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात चौथ्या हप्त्याच वितरण करण्यात आलं होत. त्यावेळी राज्य सरकारने गडबड करत निधीची मंजुरी दिली. त्यानंतर त्याचं वाटप सुद्धा केलं त्यामुळे चौथा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही.अशी शेतकऱ्यांची तक्रार होती.

2023 च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना चार महिन्याला ₹2000 याप्रमाणे तीन हप्त्यात केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुक्रमे सहा सहा हजार रुपये देण्यात येतात. खर म्हणजे लोकसभा निवडणुकीत विदर्भातील शेतकऱ्यांनी महायुतीला जोरदार दणका दिला होता. आता होऊ घातलेली राज्यातील विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीने विदर्भावर फोकस वाढवलाय त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यात पीएम किसान आणि नमो सन्मानच्या हप्त्याच वितरण करून नाराज शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून केला जातोय. आता तुम्हाला यापूर्वीचे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे किती हप्ते मिळाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी आपली पोस्ट जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *