Digi Marathi

एका रात्रीत अख्ख्या राज्याच राजकारण फिरवणारा आणि आपल्या पार्टीचा शंभर टक्के निकाल लावरणारा हा मेगास्टार आहे तरी कोण…

मार खाल्लेल्या रॉकीभाईला उठवुन पुन्हा मैदान जिकांयला लावणारा हा हसीम चाचा नेमका आहे तरी कोण बघुयात या लेखात.

एका रात्री लोकांची तुफान गर्दी जमलेलीअसते. सगळ्यांच्या माना झुकलेल्या असतात.गर्दीत जागेसाठी कोलाहल चालु असतो,एकमेकांना रेटत मागे पुढे होत गर्दीतला प्रत्येक जण जागा शोधत असतो. गर्दीच्या चोहो बाजुंनी पोलीसांच्या लाल दिव्यांच्या गाड्या गर्दीला थोपवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अचाकन रात्रीचा अंधार फोडत सुर्य निघावा आणि दाही दिशांना उजळुन टाकत आपल अस्तिव दाखवत जगतात प्रगट व्हावा तसा त्या गर्दीतुन एकच आवाज घुमतो,जय जय जय सेना.

हे सगळ वर्णन वाचुन तुम्हाला एखाद्या ऐतिहासिक कादंबरीची किंवा साऊथच्या पिक्चरची आठवण येत असेल. तर तुम्ही बरोबर आहात. वरच वर्णन आहे साऊथच्या हिरोच,साऊथच्या पॉवर स्टार पवन कल्याणच. 2019 च्या निवडणुकीनंतर पवन कल्याणच राजकारण संपल,फिल्मी करीअर संपल अशा चौकाचौकात चर्चा होऊ लागल्या. आंध्रपदेशमध्ये जगनमोहन रेड्डींनी 175 पैकी 151 जागा एकहाती जिंकल्या. चंद्रबाबु नायडु यांच्या सारख्या राजकारण उकळुन प्यायलेल्या नेत्याला धुळ चारली. तिथ पवन कल्यांणचा काय निभाव लागणार. पण हार माननार तो पवन कल्याण कसला. चित्रपटात अँग्रीमॅनची भुमिका करत कुणालाही न जुमाननारा नायक जसा त्यांने उभा केला. अगदी तसाच त्याचा कणखर बाणा त्याच्या आयुष्यातही अगदी तसाच होता अगदी राकट आणि कणखर.

पवन कल्याणची कारकीर्द सुरु झाली ती चिरंजीवी यांनी काढलेल्या प्रजा राज्यम पक्षाच्या युवा सेनेचा अध्यक्ष म्हणुन पण वाय.एस.राजशेखर रेड्डीपुढे चिरंजीवींचा काही निभावा लागला नाही आणि पुढे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्य विसर्जित झाला. परंतु पवन कल्याणला हा निर्णय काहीसा रुचला नाही. पुढे तो बराच काळ राजकारणापासुन दुर राहीला. लोकांना कुन्नीडेला कुटुंब राजकारणात विस्मरणात जाऊ लागल.

पण खरा पिक्चर सुरु झाला इथुन पुढे. पवन कल्याणन त्याचा स्वत:चा पक्ष काढला जन सेना पार्टी. केंद्रात सत्ताधारी पक्षासोबत त्याने राज्यात राजकीय हालचाली सुरु केल्या. मोर्चे असो,सभा असो किंवा एखाद्या राजकीय नेत्याला उघड उघड विरोध करणे असो, त्यांने अगदी त्याच्या फिल्मी हिरोप्रमाणे राज्य तापवण्याचा प्रयत्न केला. 2019 मध्ये तो विधानसभेला एकटा सामोरे गेला.परंतु जगनमोहन रेड्डीपुढे चद्रबाबु नायडुसारख्या मुरब्बी नेत्याचा निभाव लागला नाही तिथे पवन कल्याण सारख्या नवख्याची बिकट अवस्था झाली. 2019 च्या विधानसभेत पवन कल्याणच्या पक्षाची 137 पैकी फक्त 1 जागा निवडुन आली ती जागा होती खुद्द पवन कल्याण याची. जगनमोहन रेड्डी यांच्या झंझावातापुढे चंद्रबाबु टिकले नाही, इथुनपुढे राजकारण रेड्डींभोवती फिरणार आणि पवन कल्याण संपणार अस लोकांना वाटु लागल. राजकारणात जो संयम ठेवतो तो जिंकतो हे एक गमक आहे, आणि पवन कल्याणला हे कळुन चुकल. त्यांने पुन्हा पक्षाची बांधनी सुरु केली.

चंद्रबाबुना स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये घोटाळा केल्याच्या आरोपात राज्य सरकारने अटक केली. आणि एका रात्री पवन कल्याण निघाला आपल्या गाड्यांचा ताफा घेऊन विजयवाडाकडे निघाला त्या रात्री तुफान पाऊस सुरु होता, रस्तयावर दिसत होत्या तुफान वेगात पळणाऱ्या पवन कल्याणच्या ताफ्यातील गाड्या. पोलीसांना चाहुन लागली आणि पोलीसांनी हा ताफा रस्त्यातच अडवला पवन कल्याण त्या मुळसळधार पावसात रस्त्यात झोपला पण वाकला नाही आणि इथुनच आध्रांच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. राज्यात जगमोहन यांना पर्याय उभा करायचा असेल तर एकत्र यावे लागेल हे पवन कल्याणला कळुन चुकल होत. तस त्यांने चंद्रबाबुनां जेलमध्ये भेटुन त्याच जेलच्या बाहेर येऊन आपण चंद्रबाबु नायडु यांच्या सोबत आहोत हे जाहीर केल.

जश्या 2024 च्या निवडणुका जवळ येऊ लागल्या तस पवन कल्याणन राज्यांत रान उठवायला सुरुवात केली. राज्यात जनयात्रा काढुन त्यांने राज्यभर हिंडुन जनतेचा कानोसा घेतला,लोकांत असलेली नाराजी हेरुन जगनमोहन यांना गलितगात्र करायाला सुरुवात केली. जगनमोहन रेड्डी यांच्या फसलेल्या योजना आणि प्रशासनवर सैल होत असलेली पकड याचा फायदा घेत पवन कल्याणन त्याचा किल्ला पाडायला सुरुवात केली. राज्यात चंद्रबाबुबाबत असलेली सहानुभुती, आपल स्टारडम आणि मोंदीची प्रचार प्रणाली यांची भट्टी जमवत पवन कल्याणन 2024 विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही आघाड्यावर यश मिळवत आपल्या पक्षाचा 100 टक्के निकाल लावला.

राज्यात आणि केंद्रात जरी चंद्रबाबु नायडु यांच्या जागा जास्त दिसत असल्या तरी केजीएफ मध्ये रॉकी भाई अधिराकडुन मार खाल्यानंतर जसा त्याचा मदतीला हसीम चाचा पुढे येतो तसाचा पवण कल्याण चंद्रबाबु नायडु यांच्या मागे त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन त्यांना पुढे घेऊन आला.

Exit mobile version